कायदेशीर खाणी सुरू करा : शिवसेना

0
62

कायदेशीर खाणी ताबडतोब सुरू करा, अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुख मिलिंद तुळसकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केली.

येथील हॉटेल नेपच्यूनमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मागणी केली.

खाण बंदीमुळे खाण पट्‌ट्यातील लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली असल्याचे सांगून कायदेशीर खाणी सुरू करण्यास काहीही हरकत नसल्याचे ते म्हणाले. गोव्यात येणारे परप्रांतीयांचे लोंढे ही गोव्यापुढील सर्वांत मोठी समस्या असल्याचे सांगून येथील भूमीपुत्रांवर या लोकांमुळे अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.

परप्रांतीयांबरोबरच अमली पदार्थ, भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी या गोव्याच्या प्रमुख समस्या असल्याचे ते म्हणाले. गेल्या २२ दिवसांत राज्यात ५ खून झाले असल्याचे सांगून शिवसेना राज्य प्रमुख रमेश नाईक यांनी त्याविषयी चिंता व्यक्त केली. शिवसेना नव्या जोमाने राज्यात आपले कार्य सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.