राज्यात दररोज खून होऊ लागलेले असून, खुनांची एक मालिकाच सुरू झालेली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, असा आरोप काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर आता लोकांना सुरक्षा पुरवण्यासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही आलेमाव यांनी केली.