कायतान, लक्ष्मीनारायण उपांत्य फेरीत दाखल

0
149

सेंट कायतान मेरशी क्लबने नागेश युथ क्लब फोंडावर ५ गडी राखून तर लक्ष्मीनारायण स्पोटर्‌‌स क्लबने महारुद्र रायझिंग स्टारवर २ धावांनी विजय मिळवित शर्वाणी स्पोटर्‌‌स अँड कल्चरल क्लबने आयोजित केलेल्या दुसर्‍या स्व. संतोष साळगांवकर स्मृती अखिल गोवा शर्वाणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
संक्षिप्त धावफलक ः नागेश युथ क्लब फोंडा ः २० षटकांत ७ बाद १६९ (केदार नाईक ४०, सचिन कुपसकर ३८, सिद्धेश नाईक ३२, शुभम देसाई २१, धावा. बसुराज मदार २५/१, निखिल ३०/१) पराभूत विरुध्द सेंट कायतान मेरशी १९.२ षटकांत ५ बाद १७० (सय्यद बदलली ५५, ईशांत ३३, निखिल २९, उद्देश रामनाथकर २७/१, बाबुलाल पठाण ३४/१)
लक्ष्मी नारायण स्पोर्टस् क्लब ः २० षटकांत ७ बाद १६२ ( वैभव नाईक ४७, रघुवीर लोटलीकर ३५, सोमेश्वर नाईक २२, शिवदास परब २९/३, तुषार कुर्टीकर ३७/२) वि. वि. महारुद्र रायझिंग स्टार १८.४ षटकांत सर्वबाद १६०, तुषार कुर्टीकर ७८, रघुवीर लोटलीकर ४७, वैभव नाईक २५/४, रघुवीर लोटलीकर २६/२, युग्गम नाईक १०/२)