कांदोळी व्हेटरन्सने वास्को व्हेटरन्सचा टायब्रेकरवर ६-५ असा पराभव करत फातोर्डा फॉरवर्ड व्हेटरन्स फुटबॉल स्पर्धेेचे विजेेतेपद पटकावले. फातोर्डा फॉरवर्ड व्हेटरन्स यांनी आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार २२ रोजी फातोर्डा मैदानावर खेळविण्यात आला.
सामन्याच्या पहिल्या सत्रात कांदोळी व्हेटरन्सचा संघ एका गोलने आघाडीवर होता. एन्सी डिसोझाने हा गोल लगावला. दुसर्या सत्रात उदय नाईकने वास्कोला बरोबरी साधून दिली. कांदोळीने यानंतर टायब्रेकरवर सरस खेळ दाखवला. विजेत्या संघाने ३० हजार रुपये व चषकाची कमाई केली तर उपविजेत्यांना २० हजारांवर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभाला नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.
वैयक्तिक बक्षिसे ः सामनावीर ः व्हिन्सेंट कुलासो (वास्को), सर्वोत्तम बचावपटू ः हिलरी सुआरिस (कांदोळी), पहिला गोल ः इन्सी डिसोझा (कांदोळी), स्पर्धावीर ः रेमी बार्रेटो (माजोर्डा).

