गोवा प्रदेश काँग्रेस समिती आणि आरजीपी यांच्यातील आगामी निवडणुकीच्या आघाडी प्रश्नी चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची दोनापावल येथे एका हॉटेलमध्ये काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक आघाडीच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, समान जाहीरनाम्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याशिवाय मतदारसंघ वाटपावर चर्चा करण्यात आली; पण मतदारसंघ वाटपाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सहप्रभारी अंजली निंबाळकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. या बैठकीला काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर, आरजीपीच्या राज्य अध्यक्ष शाविना शिरोडकर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

