पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुन्हा एकदा राज्यसभेत काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. लाल दिव्याची संस्कृती का सुरू ठेवली, काँग्रेसने ब्रिटिश कायदे का बदलले नाहीत, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. काँग्रेसने येत्या लोकसभा निवडणुकीत 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील, ते आज आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत. काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्थितीला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
आगामी निवडणुकीत काँग्रेसला 40 जागाही मिळाल्या, तर ती त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागाही वाचवणे कठीण होणार आहे, असे मोदी म्हणाले.