‘वंदे मातरम्’ गाण्याच्या 150 वर्षपूर्तीच्या निमित्ताने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मोदींनी ‘वंदे मातरम्’ गाण्यावरून पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. मुस्लिम लीगच्या दबावामुळे काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ गाण्याचे तुकडे केले, असा गंभीर आरोपही मोदींनी केला.
वंदे मातरम् हे ब्रिटिशांना सडेतोड उत्तर होते, ही घोषणा आजही प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनाही ते आवडले होते. त्यांना हे गीत राष्ट्रगीत म्हणून दिसत होते. मोहम्मद अली जिन्ना यांनी 15 ऑक्टोबर 1936 रोजी लखनौमधून वंदे मातरम्विरोधात घोषणा दिली. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना आपले सिंहासन डळमळताना दिसले. मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी, त्यांचा निषेध करण्याऐवजी उलटेच घडले. नेहरूंनी वंदे मातरम्चीच चौकशी सुरू केली. तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या दबावाली काँग्रेसने वंदे मातरम्चे विभाजन केले, असा आरोप मोदींनी केला.