कवळे-ढवळी बायपास रस्त्याजवळ असलेल्या घरात शांता विश्राम केरकर, ५० वर्षे वयाच्या महिलेने काल गळफास लावून आत्महत्या केली. सदर महिला मूळ काकोडा येथील असून ती कवळे येथे आपल्या मुलीकडे राहायला आली होती.
काल दुपारी घरात कोणी नाही असे पाहून तिने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. फोंडा पोलिसानी पंचनामा केला.