कळंगुट, वागातोर किनारी पर्यटनमंत्र्यांनी दिली भेट

0
11

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कळंगुट आणि वागातोर समुद्र किनाऱ्याला काल अचानक भेट दिली. यावेळी मंत्री खंवटे यांनी, समुद्र किनाऱ्यावरील सर्व बेकायदेशीर कृत्ये थांबवण्यासाठी पोलीस आणि पर्यटन अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
पर्यटकांकडून अवाजवी शुल्क आकारल्याने एक जलक्रीडा काउंटर बंद करण्यात आला आहे. जीईएल उद्यापासून त्या ठिकाणी काउंटर सुरू करणार आहे आणि क्यू प्रणालीनुसार जलक्रीडा उपक्रम राबवले जातील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि आमदार मायकल लोबो यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर ही आकस्मिक भेट देण्यात आली आहे.