Home बातम्या कळंगुट येथे डान्सबारवर छाप्यात ९ मुलींची सुटका

कळंगुट येथे डान्सबारवर छाप्यात ९ मुलींची सुटका

0

पोलिसांनी या रेस्टॉरंटचे व्यवस्थापक यल्टन मार्कीस ३४ मुंबई याला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या रेस्टॉरंटमधील डान्सबारवर नृत्यंगना म्हणून काही युवतींना आणण्यात आले होते. त्यांचा नृत्यांसाठी आणि अनैतिक व्यवसायासाठी वापर केला जात असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली असता पोलीस निरीक्षक नीलेश राणे, उपनिरीक्षक देव्यांनी नाईक, हवालदार सुभाष मालवणकर, कॉन्स्टेबल विनोद नाईक आणि शुभदा कवळेकर यांनी त्याठिकाणी जाऊन छापा टाकला आणि या युवतींची सुटका केली.

डान्सबार मधून सुटका केलेल्या नऊ युवतींची रवानगी सुधारगृहात केली. या युवती नेपाळ, सिक्कीम, गोवा, मुंबई आणि पश्‍चिम बंगालमधील आहेत. पोलिसांनी रेस्टॉरंटच्या मालकावर गुन्हा दाखल केला. संशयित यल्टन मार्कीस या व्यवस्थापकास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडीत पाठविले आहे. पर्यटन मौसमाला सुरुवात होताच बार्देश तालुक्यातील समुद्र किनार्‍यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. दिवाळीची सुट्टी असल्याने यात पर्यटकांची वाढ झालेली आहे. यामध्ये देशी पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत येतात आणि काही आबंट शौकीनही पर्यटक म्हणून हॉटेल मध्ये मौजमजा करण्यासाठी उतरतात. हॉटेलवाले त्यासाठी गोवा राज्याबरोबरच इतर राज्यातील तरुणींना त्याच्यासाठी तैनात करून ठेवतात. काहीसा प्रकार स्थानिक पोलिसांना असतो पण अशा अनैतिक प्रकारावरून हॉटेल मालक चालक याचे न पटल्याने पोलीस त्यांच्यावर छापा टाकतात आणि युवतीची सुटका केली म्हणून जाहीर करतात. पण या समुद्र किनार्‍यावरील रेस्टॉरंटमध्ये अनेक ठिकाणी अनैतिक व्यवसाय चालतो. तो बाराही महिने चालू असतो पण पर्यटन मौसमात त्यात वाढ होते.

तसेच चरस, ड्रग्स अशा अमली पदार्थ विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो. त्यातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पर्रा येथे झालेल्या नायजेरियनच्या खुनासारखे आणि मारामार्‍याही होतात. अशाच प्रकारे काल भर म्हापशात ५ लाख रुपयांचा चरस पकडला गेला.