Home बातम्या कळंगुट येथे अपघातात एक ठार

कळंगुट येथे अपघातात एक ठार

0

कळंगुट येथे काल रात्री साडे आठच्या सुमारास ऍक्टीव्हा स्कूटर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर टक्कर झाल्याने ऍक्टीव्हा स्कूटर वरील इगवीन साईडीन (३१) हा नायजरियन नागरिक जागीच ठार झाला.

भाडेपट्टीवर चालविण्यास घेतलेली ऍक्टीव्हा स्कूटर घेऊन मयत इगवीन साईडीन कळगुंट येथे येत असता समोर भरधाव वेगाने मोटारसायकलवरून आलेल्या मिश्रा (३६) नामक पर्रा येथील युवकाने ऍक्टीव्हाला जोरदार धडक दिल्याने नायजेरियन नागरिक रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाला.