दरम्यान, बार्देश १चे गटविकास अधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्या निलंबनाचा आदेश आज संध्याकाळपर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.
प्रभाग फेररचना गैरव्यवहार प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी बार्देस- १ चे गट विकास अधिकारी शिवप्रसाद नाईक, कळंगुट पंचायत सचिव, कारकुन व तलाठी यांना सेवेतून निलंबित करण्याची शिफारस केली होती.
प्रभाग आरक्षण संबंधी पंचायत व संचालकांना खोटी माहिती पुरविण्यास जबाबदार असलेल्या चारही अधिकार्यांना निलंबित करण्याची शिफारस आयुक्तांनी केली होती.