कलम 39 (अ) च्या वापरासाठी नियम तयार

0
6

नगरनियोजन खात्याने नगरनियोजन कायद्यातील कलम 39 (अ)च्या अंमलबजावणीसाठी नियम अधिसूचित केले आहे. प्रादेशिक आराखड्यातील विभाग बदलासाठी प्रक्रिया तसेच बाह्यविकास आराखड्यातील विभाग बदलासाठीची प्रक्रिया त्याद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. या नव्या अधिसूचित करण्यात आलेल्या नियमामुळे मुख्य नगरनियोजकाला प्रादेशिक आराखडा अथवा बाह्य विकास आराखड्याशी संबंधित नगरनियोजकाला प्रादेशिक आराखडा अथवा बाह्य विकास आराखड्याशी संबंधित भू-विभागात सरकारी आदेश अथवा व्यक्तींकडून आलेल्या अर्जाच्या आधारे विभाग बदल अथवा विभागात फेरफार करता येईल. एकदा विभाग बदलासाठीच्या प्रस्तावाला नगर नियोजन मंडळाने मान्यता दिली की त्यासंबंधी लोकांचे म्हणणे, सूचना अथवा आक्षेप मागवले जातील. नगरनियोजन खात्याला त्यासंबंधी लेखी कळवण्यास संबंधितांना 30 दिवसांचा अवधी देण्यात येईल. हा 30 दिवसांचा अवधी संपल्यानंतर प्रस्ताव नगरनियोजन मंडळाकडे जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णयासाठी तो सरकारकडे जाईल, असे या नियमांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.