कर्नाटक बंदप्रकरणी 200 जणांना ताब्यात

0
24

कावेरीचे पाणी तमिळनाडूला सोडण्याच्या निषेधार्थ कन्नड समर्थक संघटनांनी कर्नाटकात पुकारलेल्या राज्यव्यापी बंदप्रकरणी 200 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंद दरम्यान केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 44 उड्डाणे रद्द करण्यात आली. राज्यातील वाहतूक सेवाही खंडित झाली असून हॉटेल आणि इतर सुविधाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूत 144 कलम अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.