कर्नाटक – गोवा सीमेवर मद्यालये बंदीचा आदेश

0
5

कर्नाटक राज्यातील राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकनजीकच्या सीमाभागातील गोवा राज्यातील पाच किलोमीटर क्षेत्रातील मद्यालये 8 मे रोजी संध्याकाळी 6 ते 10 मे 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मागू हागे यांनी उत्तर गोवा क्षेत्रातील कर्नाटक सीमेजवळील पाच किमी क्षेत्रातील मद्यालये 8 ते 10 मे या काळात बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. मद्यालय आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेली व्यावसायिक केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवू शकतात. त्यांना मद्य विक्री बंद ठेवावी लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मद्यालयांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.