31 C
Panjim
Monday, January 25, 2021

कर्नाटकातून गोव्यात येणार्‍या खनिज ट्रकांना परवानगी कोणी दिली? ः कॉंग्रेस  

 

गोव्यातील खाण पट्‌ट्यात सध्या जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली कोरोनाचा फैलाव झालेल्या कर्नाटकातून येणार्‍या सुमारे २०० ट्रकांची बेदरकार वाहतूक चालू आहे. या वाहतुकीवर सरकारने त्वरित नियंत्रण आणावे अशी मागणी करत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या ट्रकांना परवानगी कोणी दिली असा सवाल केला आहे.

या खनिज वाहतुकीमुळे स्थानिक लोकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे भयंकर अपघात होण्याचे संकट उभे ठाकले आहे. देशात लॉकडाऊनमुळे आंतरराज्य वाहतूक बंद असतानाही गोवा सरकारने खनिज ट्रक वाहतुकीला कोणत्या आधारे परवानगी दिली हे स्पष्ट करावे. तसेच मोदी सरकारने खाण व्यवसायाचा जीवनावश्यक सेवामध्ये समावेश केला आहे का हेही सरकारने स्पष्ट करावे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

स्थानिक खाण अवलंबीतांवर सध्या उपासमारीची पाळी आलेली असताना, गोमंतकीयांचे ट्रक वापरणे सोडून सरकार आज कर्नाटकातील ट्रक मालकांना व चालकांना परवानगी देते, यावरून गोव्याच्या भाजप सरकारची गोमंतकीयांप्रती असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कर्नाटकातून येणारे ट्रकचालक, क्लिनर यांची कोरोना चाचणी केली जाते का व त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र कोण देतो हे सरकारने लोकांना सांगणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून गोमंतकीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा यावेळी चोडणकर यांनी दिला.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

गो गोवा ऑर्गेनिक

श्रीरंग व्यंकटेश जांभळे सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे...

‘कोरोना’च्या आशीर्वादाचे- असेही अभ्यंग… अवती-भवती

अंजली आमोणकर या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या...

सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज

शशांक मो. गुळगुळे तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून...

दुभंगलेला अमेरिकन समाज

दत्ता भि. नाईक आतापर्यंत अमेरिकेतील द्विपक्षीय लोकशाही खेळीमेळीने चालते असा लौकिक होता. दोन्ही पक्षांमध्ये देशाच्या ध्येयधोरणांविषयी मतभिन्नता नसल्यामुळे...

कोरोनानंतरचे अर्थकारण

महेश देशपांडे, (गुंतवणूक सल्लागार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. गुंतवणूक म्हणून मालमत्तेपेक्षाही शेअर्स तसंच...

ALSO IN THIS SECTION

‘इन टू द डार्कनेस’ला सुवर्ण मयुर

>> इफ्फीचा शानदार समारोप, अभिनेते विश्‍वजीत चटर्जी यांना भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार काल रविवार दि. २४ रोजी समारोप झालेल्या ५१व्या...

मुंबईत शेतकर्‍यांचा महामुक्काम सत्याग्रह

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात...

दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चासाठी पोलिसांनी दिली परवानगी

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनातील शेतकर्‍यांनी उद्या मंगळवार दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिनी टॅक्टर मोर्चा काढण्यासाठी...

आजपासून हिवाळी अधिवेशन

गोवा विधानसभेच्या चार दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार २५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होणार असून २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राज्यपाल भगत सिंग...

दाबोळी विमानतळावर ९३ लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर गोवा जकात विभागाने केलेल्या कारवाईत २ किलो १७० ग्रॅम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केले. याची किंमत ९५ लाख ३ हजार...