कर्नाटकातील अपघातात गोव्यातील 7 जण जखमेी

0
6

तामिळनाडूतील वालंकिनी सायबिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या म्हापसा येथील भाविकांच्या वाहनाला गोव्यात परतताना रामनगर-धारवाड मार्गावर कुभांरडा येथे काल अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर बेळगाव येथील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

म्हापसा येथील भाविकांचा एक गट वालंकिनी सायबिणीच्या दर्शनासाठी खासगी मिनीबसने गेला होता. रामनगर-धारवाड मार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात जॉन फर्नांडिस (38, म्हापसा) गंभीर जखमी झाले. अन्य जखमींमध्ये टोजेंटा परेरा (15), इझावेल फर्नांडिस (40), जीन परेरा (45), मालीन फर्नांडिस (8), जॉन्सन फर्नांडिस (3) आणि जेनुस्टा परेरा (17) यांचा समावेश आहे. या वाहनात एकूण अकरा जण होते. लोंढा पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.