कर्नाटकसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

0
4

कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आपला जाहीरनामा ‘प्रजा ध्वनी’ नावाने प्रसिद्ध केला. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बंगळुरू येथे जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. गोव्याचा विरोध असतानाही म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करू असे आश्वासन या जाहीरनाम्यात दिले आहे. त्याशिवाय समान नागरी संहिता आणि दारिद्य रेषेखालील कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.