कर्नल सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचे आक्षेपार्ह विधान

0
26

मध्यप्रदेश सरकारचे मंत्री विजय शहा यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले आहे. ज्या लोकांनी आमच्या मुलींचे कुंकू पुसले होते, मोदींनी त्यांच्या बहिणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केले, असे आक्षेपार्ह विधान शहा यांनी केले. इंदूरमधील महू येथील रायकुंडा गावात आयोजित हलमा कार्यक्रमात सोमवारी शहा यांनी हे विधान केले. मंगळवारी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. विजय शहा यांच्या या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली असून काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.