कर्जामुळे बार्जेसची विक्री

0
50

खाण व्यवसाय बंद पडल्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज वाढत राहिल्याने राज्यातील अनेक बार्ज मालकांनी आपल्या बार्जिस ५० टक्के दरात विकण्यास सुरुवात केली असून त्यामुळे गुजरात राज्यातील अनेकांना स्वस्त दरात बार्जेस खरेदी करणे शक्य झाल्याची माहिती या क्षेत्रातील एका व्यवसायिकाने दिली.

प्रती बार्जची किंमत सुमारे सहा ते साडेसहा कोटी रुपये असते. काहींनी अडीज ते तीन कोटी रुपयांनाही विकल्याची उदाहरणे असल्याचे सांगून गुजरात राज्यातील अनेकजण बार्जीसाठी गोव्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
गोव्यात सुमारे ३०० बार्जीस होत्या. प्रत्येक बार्जवर १८ कर्मचारी मिळून सुमारे साडेपाच हजार बार्ज कर्मचारी आहेत. सध्या ते बेरोजगार बनले आहेत. बार्जीस बंद असल्याने त्यांची देखभाल करणारे ‘डॉक’चा व्यवसायही ठप्प झाला आहे.