करंजाळेत झाडावरून पडून युवक ठार

0
57
अनिल सिंग (२५) हा युवक काल करंजाळे येथे जांभळीच्या झाडावरून खाली पडल्याने ठार झाला. अनिल सिंग हा मूळ मध्यप्रदेश येथील असून तो कोब्रा सेक्युरिटी या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता.

काल दुपारी २ च्या दरम्यान तो जांभळे काढण्यासाठी झाडावर चढत असता पाय घसरून खाली पडला. इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे.