कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसचा हात सोडला असून, कॉंग्रेसच्या जी-२३ गटाचा प्रमुख भाग असलेले कपिल सिब्बल यांनी काल कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली. तसेच, समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेवर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सिब्बल यांनी काल लखनऊमध्ये जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. त्यानंतर सिब्बल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.