कडाक्याच्या थंडीने गोमंतकीय गारठले

0
3

कडाक्याची थंडी काय असते, याचा अनुभव सध्या गोमंतकीय घेत आहेत.
राजधानी पणजीसह संपूर्ण राज्यात बोचर्‍या थंडीची लाट पसरली आहे. रात्रीच नव्हे, तर संपूर्ण दिवसभर थंडीचा माहौल जाणवत आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच हवेत गारवा निर्माण होत असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी तर अक्षरश: गारठल्याचा अनुभव गोमंतकीय घेत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले होते. काल कमी तापमानामुळे दिवसभरात थंडीच जाणवत होती. थंडीबरोबरच राज्यातील काही भागात दाट धुके पडत आहे. राज्यातील तापमानात सामान्यापेक्षा खूप कमी नोंद झाली आहे. राज्यातील किमान तापमानात मागील काही दिवसांत घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. राज्यातील ग्रामीण भागात सुध्दा थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

मागील चोवीस तासात पणजी येथे किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस नोंद झाली. या वर्षातील हे आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. तसेच ते सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअस एवढे कमी आहे.