वीज खात्यात कंत्राटी पद्धतीवर दहा वर्षे कार्यरत असलेल्या मीटर रिडरच्या प्रश्नाचा अभ्यास करून योग्य तोडगा काढला जाणार आहे, असे आश्वासन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत शून्य तासाला बोलताना काल दिले.
विधानसभेत शून्य तासाला आमदार कार्लुस फेरेरा यांनी वीज खात्यात गेली कित्येक वर्षे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता.
वीज खात्यातील बंच केबल घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही वीज मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. आमदार संकल्प आमोणकर यांनी बंच केबल घोटाळा प्रकरणी शून्य तासाला मुद्दा उपस्थित केला होता.