Home बातम्या ओबीसी ‘क्रिमी लेअर’ची उत्पन्न मर्यादा ६ लाख रु.

ओबीसी ‘क्रिमी लेअर’ची उत्पन्न मर्यादा ६ लाख रु.

0

‘ओबीसी’ गटातील विविध लाभधारकांना सवलतींचा जास्तीत जास्त लाभ व्हावा या हेतूने ओबीसीतील ‘क्रिमी लेअर’साठी (सधन गटाकरिता) उत्पन्न रु. ४.५ लाखवरून रु. ६ लाखपर्यंत निर्धारित करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला.

यापूर्वी ओबीसी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रु. पेक्षा जास्त असल्यास त्याला सधन गटात समजले जाई. आता ही मर्यादा ६ लाख रु.पर्यंत वाढविली आहे. ‘क्रिमी लेअर’ गटातील सधन ओबीसींना आरक्षण सुविधेचा लाभ मिळत नाही. आता उत्पन्नसीमा वाढविल्यामुळे रोजगार व शिक्षणात आणखी ओबीसींना २७ टक्के आरक्षणासाठी अर्ज करता येईल.

दरम्यान, ओबीसी आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पन्नसीमा शहरी भागासाठी १२ लाख रु. तर ग्रामीण भागाकरिता ९ लाख रु. निर्धारित करण्याची शिफारस केली होती. मात्र तसे केल्यास खूप कमी लोकांना आरक्षणाचा लाभ मिळेल, असे ठरवून ही सूचना अव्यवहार्य ठरविण्यात आली होती. हल्ली या विषयावर स्थापन केलेल्या मंत्रिगटाने रु. ६ लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्‍चित केली होती.