ऑपरेशन टायगर’बाबत संभ्रम कायम

0
10

दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’संबंधी अद्यापही संभ्रम असल्याचे चित्र आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना सह्यांचे पत्र दिले असल्याची चर्चा सुरू असताना ते पत्र किंवा सहा खासदारांचा फोटो मात्र अद्याप समोर आला नाही. त्यामुळे सहापैकी दोन खासदारांनी सह्याच केला नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे.
ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्या सहापैकी दोन खासदार हे अद्यापही आपल्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा आता ठाकरेंकडून करण्यात येत
आहे.

आजच्या बैठकीत चित्र स्पष्ट
ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रतोद अनिल देसाई यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे या बैठकीला आता कोण कोण खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या सहा खासदारांची चर्चा सुरू आहे त्यापैकी किती खासदार गुरुवारच्या बैठकीला उपस्थित राहणार यावरुन शिंदेंच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले की नाही हे स्पष्ट होणार आहे.