ऑगस्टनंतर निवृत्त होणार्‍या शिक्षकांना ३० मेपर्यंत सेवा वाढ

0
48

शिक्षण खात्याने नुकत्याच जारी केलेल्या एका अधिसूचनेद्वारे शैक्षणिक वर्षातील १ ऑगस्ट किंवा त्यानंतर कधीही निवृत्त होणार्‍या शिक्षकांना दि. ३० मे पर्यंत सेवावाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशा शिक्षकांना जास्तीत ज्यास्त ९ महिने अधिक सेवेचा लाभ होईल.

ऑगस्ट किंवा त्यानंतर शिक्षक निवृत्त झाल्यास विद्यार्थ्यांची नुकसानी होऊ शकते. पर्यायी शिक्षकाची सोय करणे अडचणीचे होते. विद्यार्थ्यांना नुकसानी होऊ नये म्हणूनच शिक्षण कायद्यातील नियमात दुरुस्ती करून वरील अधिसूचना जारी करण्यात आल्याचे शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शिकविण्याची शिक्षकाची इच्छा, कार्यक्षमता विचारात घेऊन तसेच व्यवस्थापनाच्या मताचा विचार करूनच वरील निर्णय लागू केला जाईल. त्यामुळे अकार्यक्षम शिक्षकांना वरील निर्णयाचा लाभ होण्याची शक्यता नाही.