23.8 C
Panjim
Friday, November 27, 2020

ऑक्टोबरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली

>> रविवारी ६ मृत्यू, ३२१ रुग्ण बरे

राज्यात चोवीस तासांत नवीन २११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३२१ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या बळींची एकूण संख्या ५७६ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार २४२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २५७६ एवढी झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त आहे. चोवीस तासात आणखीन ३२१ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५४ टक्के एवढे आहे.

आणखी ६ जणांचा बळी
बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या २५ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह १४८ रूग्णांचा बळी गेला आहे. या सर्व रुग्णांवर १० ते १२ दिवस आयसीयूमध्ये ठेवून त्यांना पॉटोकॉलनुसार औषधे देण्यात आली होती, अशी माहिती दैनंदिन अहवालात देण्यात आली आहे. नेवरा येथील ५९ वर्षांचा पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ७३ वर्षार्ंचा पुरुष रुग्ण, वाळपई येथील ७५ वर्षांचा पुरुष रुग्ण, खोर्ली येथील ७६ वर्षांचा पुरुष रुग्ण, मांद्रे येथील ५० वर्षांचा पुरुष रुग्ण आणि पणजी येथील ८३ वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले.
बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत चोवीस तासांत १०१८ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २११ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखी ६८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयझोलेशनखालील रुग्णांची संख्या २१ हजार ०६४ एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन ४० रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहेत.

उत्तर गोव्यातील पर्वरी परिसरात सर्वाधिक १८५ रुग्ण आहेत. चिंबल येथे १५१ रुग्ण, डिचोली येथे १२२ रुग्ण, पणजी येथे ११३ रुग्ण, म्हापसा येथ १११, कांदोळी येथे ११३ रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात सर्वाधिक २३२ रुग्ण आहेत. फोंडा येथे १३७ रुग्ण, वास्को येथे १३० रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे.

कोविड केअर सेंटर बंद
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्येत घट झाल्याने अनेक कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली आहे. राज्यातील कोविड केअर सेंटरमधील खाटा मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत. उत्तर गोव्यात कोविड सेंटरमध्ये एकूण ४६९ खाटा उपलब्ध आहेत. त्यातील ३४७ खाटा रिकाम्या आहेत. दक्षिण गोव्यात कोविड सेंटरमध्ये एकूण ६९२ खाटा उपलब्ध आहेत. त्यातील ५६३ खाटा रिकाम्या आहेत.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION

सुरक्षा रक्षकाचा कुंकळ्ळीत खून

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातील सुरक्षा रक्षकाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मंगळवारी सकाळी हा...