ऐतिहासिक वास्तूंचाअहवाल सादर करा

0
8

राज्यातील संरक्षित अशा ऐतिहासिक वास्तूसंबंधीचा अहवाल सादर करा, असा आदेश काल उच्च न्यायालयाने गोवा सरकारच्या पुरातत्त्व व पुराभिलेख खात्याला दिला. केपे, पारोडा येथील संरक्षित स्थळ व वास्तू असलेल्या चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या नादात या परिसराचे पूर्णपणे विद्रुपीकरण करण्यात आले असल्याचे न्यायालयाने पुरातत्त्व व पुराभिलेख खात्याच्या निदर्शनास आणून दिले. पुरातत्त्व व पुराभिलेख खात्याने निसर्गसौंदर्याने नटलेल्या भूतनाथ देवस्थान परिसरात 2018 साली संरक्षक भिंत उभाण्यास जी परवानगी दिली त्यासंबंधी न्यायालयाने प्रश्न उपस्थित करून पुरातत्त्व खात्याला राज्यातील ऐतिहासिक अशा संरक्षक स्थळांची एक यादी त्यांच्या सीमा व नकाशे तसेच त्यांचे सौंदर्यीकरण अथवा विकास करण्यासाठी जर कोणत्याही एजन्सींना परवानगी दिली असेल तर त्यासंबंधीच्या तपशिलासह सादर केली जावी, असा आदेश दिला आहे.