एसटी राजकीय आरक्षणासाठीकेंद्रीय मंत्री अमित शहांना साकडे

0
4

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत घेतली भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या विधानसभेत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी जलदगतीने करावी, अशी विनंती केली, त्याला अमित शहांनी सकारात्मक दिला. तसेच, गोवा सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची आणि विकासकामांची माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना
दिली.

माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते गोवा पोलिसांना ‘पोलीस कलर्स’ प्रदान करण्याच्या समारंभासाठी अमित शहा यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. तसेच, संपूर्ण गोवा भाजपच्या वतीने गोव्यातील नवीन भाजप मुख्यालयाच्या उद्घाटनासाठीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना निमंत्रण दिले.