एसटी महिलांसाठी राय मतदारसंघ राखीव

0
14

गोवा राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 6 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या जिल्हा पंचायत मतदारसंघ राखीवता अधिसूचनेत दुरुस्ती केली असून, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा राय मतदारसंघ अनुसूचित जमातीतील (एसटी) महिलांसाठी राखीव जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी यासंबंधीची दुरुस्ती सूचना जारी केली आहे. आयोगाने 6 नोव्हेंबरला जारी केलेल्या सूचनेत हा मतदारसंघ एसटींसाठी राखीव जाहीर केला होता. आता, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा राय मतदारसंघ एसटी महिलांसाठी राखीव जाहीर करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात मतदारसंघ आरक्षणाबाबत याचिका प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने एका मतदारसंघाच्या राखीवतेमध्ये दुरुस्ती केली आहे.