एसआयआरसाठी भरलेले 99.97 टक्के अर्ज परत

0
13

राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनासाठी (एसआयआर) मतदारांना भरलेले अर्ज सादर करण्यासाठी 11 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.
राज्यातील सुमारे 99.97 टक्के मतदारांनी एसआयआरसाठी आपले भरलेले अर्ज कालपर्यंत सादर केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील सुमारे 11 लाख 85 हजार 034 मतदारांना अर्जांचे वितरण केले आहे. त्यातील 11 लाख 84 हजार 627 मतदारांनी अर्ज सादर केले असून या सर्व अर्जांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे.

मतदार यादीच्या पुनरावलोकनासाठी मतदारांना भरलेले अर्ज सादर करण्यासाठी पूर्वी 4 डिसेंबर ही तारीख निश्चित केली होती. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांना भरलेले अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावी म्हणून अंतिम तारखेमध्ये वाढ केली आहे.