स्टार स्पेनीश स्ट्रायकर फेर्रान कोरोमिनासने नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर एका गोलाच्या पिछाडीवरून दमदार पुनरागम केल्याने एफसी गोवा आणि ऍटलेटिको दी कोलकाता यांच्यातील हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील लढत १-१ अशी गोल बरोबरीत संपली. संपूर्ण दिवसाच्या प्रावासानंतर काहीशा थकलेल्या एफसी गोवाच्या संघाने सामना अनिर्णीत सोडविण्यात यश मिळविले.
बरोबरीमुळे एफसी गोवाचे ७ सामन्यातून १३ गुण झाले असून ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानी पोहोचलेत. तर ऍटलेटिको दी कोलकाता संघ ९ गुणांसह आठव्या स्थानी आहे.
रंगतदार झालेल्या या सामन्यात ४थ्याच मिनिटारा रॉबी कीयानने हेडरद्वारे गोल नोंदवित ऍटलेटिको दी कोलकाताला आघाडीवर नेले होते. तर २४व्या मिनिटाला गोल मशिन फेर्रान कोरोमिनासने एफसी गोवाला १-१ अशी बरोबरी साधून देत गुण विभागून दिले.

