एप्रिल ते जूनमध्ये अपघातात ५९ बळी

0
14

>> तीन महिन्यांत ८०२ वाहन अपघात

>> मे महिन्यात सर्वाधिक ३० मृत्यू

राज्यात एप्रिल ते जून २०२२ या तीन महिन्यांच्या काळात ८०२ वाहन अपघातांत ५९ जणांचा बळी गेला आहे. त्यात ३६ दुचाकी वाहन चालक, ५ दुचाकीस्वार, ११ पादचार्‍यांचा समावेश आहे. मे २०२२ या महिन्यात सर्वाधिक ३० अपघाती बळींची नोंद झाली. वाहतूक खात्याकडून २३१८ जणांना चलन देण्यात आले आहे.
वाहतूक खात्याने या तीन महिन्यांच्या वाहन अपघाताची माहिती जारी केली आहे. एप्रिल २०२२ या महिन्यात एकूण २४२ रस्ते अपघातांची नोंद झाली. त्यात ११ जीवघेणे अपघात, १६ गंभीर अपघात, ४३ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. या महिन्यातील अपघातांमध्ये ११ जणांचा बळी गेला आहे. त्यात १० दुचाकीस्वार, १ पादचार्‍यांचा समावेश आहे. या महिन्यात झालेल्या अपघातात २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहतूक प्राधिकरणाद्वारे एकूण ९११ चलन जारी करण्यात आली.

मेमध्ये ३० जणांचा मृत्यू
मे २०२२ या महिन्यात ३२१ रस्ते अपघाताची नोंद झाली. त्यातील २८ अपघात जीवघेणे अपघात, १५ गंभीर अपघात, ६५ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. या अपघातांमध्ये ३० जणांचा बळी गेला आहे. त्यात १७ दुचाकी स्वार, ३ चालक, ८ पादचारी आणि २ इतरांचा समावेश आहे. तर १८ लोक गंभीर जखमी झाले. या मे २०२२ मध्ये वाहतूक प्राधिकरणांद्वारे एकूण ८६९ चलन जारी करण्यात आली.

जूनमध्ये २३९ अपघात
राज्यात जून २०२२ या महिन्यात एकूण २३९ रस्ते अपघाताची नोंद झाली. त्यात १८ जीवघेणे अपघात, १५ गंभीर अपघात, ४३ किरकोळ अपघातांचा समावेश आहे.

या महिन्यात रस्ता अपघातात एकूण १८ जणांचा बळी गेला आहे. त्यात १२ दुचाकी स्वार, २ दुचाकीवर मागे बसलेले, १ चालक आणि २ पादचारी आणि इतर १ जणाचा मृत्यू झाला आहे. तर, १९ जण गंभीर जखमी झाले आहे. जून २०२२ मध्ये वाहतूक प्राधिकरणांद्वारे एकूण ५३८ चलन जारी करण्यात आली.