एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा गोव्यात निवडणूक प्रचार

0
13

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक प्रचारासाठी काल गोव्यात दौरा केला. राज्यातील भाजप, मगोप आणि तीन अपक्ष मिळून २५ आमदार आणि २ खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

येथे आयोजित एका कार्यक्रमात एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी राज्यातील सत्ताधारी गटातील आमदारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदींची उपस्थिती होती.
राज्यातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.