एनजीपीडीए अध्यक्षपदीरोहित मोन्सेरात नियुक्त

0
7

उत्तर गोवा नगर नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अध्यक्षपदी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगर आणि ग्राम नियोजन खात्याने उत्तर गोवा नगरनियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या समितीची पुनर्रचना केली आहे. या प्राधिकरणामध्ये पणजी, ताळगाव, बांबोळी आणि म्हापसा या नियोजन क्षेत्रांचा समावेश होत आहे. पणजी, पर्वरी, म्हापसा, हळदोणा, साळगाव, थिवी आणि शिवोलीचे आमदार या प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य आहेत. इतर सदस्यांमध्ये म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक सुशांत हरमलकर आणि आशीर्वाद खोर्जुवेकर, म्हापशाचे रुपेश कामत, सागर नाईक आणि कळंगुटचे गुरुदास शिरोडकर, तसेच ताळगावचे पेड्रो कुतिन्हो आणि मारिओ फर्नांडिस यांचा समावेश आहे. नगररचना अधिकारी हे सदस्य-सचिव म्हणून काम पाहतील, असे सूचनेत म्हटले आहे.