एनआयओचा ‘तो’ अहवाल धक्कादायक : मनोज परब

0
11

कर्नाटकने गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी वळवले तरी त्याचा गोव्यावर काहीही परिणाम होणार नाही, असा जो धक्कादायक अहवाल एनआयओने तयार केलेला आहे, तो अहवाल म्हणजे गोव्याशी गद्दारी असल्याचा आरोप काल रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. 2024 साली भारतीय समुद्रविज्ञान संस्थेतील तिघा बिगरगोमंतकीय वैज्ञानिकांनी हा अहवाल तयार केल्याचे सांगून परब यांनी या अहवालाविषयी शंका व्यक्त केली. या तिघा बिगरगोमंतकीय वैज्ञानिकांनी तयार केलेल्या अहवालावरून त्यांना गोव्याशी काहीही देणे घेणे नाही. तसेच त्यांना गोव्याची चिंता नाही हे स्पष्ट होत असल्याचे परब म्हणाले. वरील धक्कादायक अहवाल सार्वजनिक झालेला असताना गोवा सरकार तसेच म्हादईप्रश्नावरील सभागृह समिती मूग गिळून गप्प का आहे, असा सवालही परब यांनी केला.