काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘एच फाईल्स’मुळे सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोग यांचे कारनामे उघड झाले आहेत, असा आरोप काल गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगाने शून्य गृहक्रमांक हे बेघर लोकांना देण्यात आल्याचे म्हटले होते. तसे सांगून निवडणूक आयोगाने खोटी माहिती दिल्याचे आता उघड झाल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. हरियाणात मतांची फसवणूक करण्यासाठी बनावट छायाचित्रे, मतदारांची खोटी नावे, खोटे पत्ते, खोटे वयोमान दिल्याचे उघड झाले असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.
एका घरातील मतदारांची संख्या ही 501 एवढी राखण्यात आलेली आहे हे धक्कादायक असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असल्याचे आलेमाव म्हणाले.
याचा अर्थ भाजप सत्तेत टिकून राखण्यासाठी मतांची हेराफेरी करीत आहे हे उघड असल्याचे ते म्हणाले.

