एका बळीसह राज्यात २५ कोरोनाचे रुग्ण

0
16

राज्यात गेल्या चोवीस तासांत एका कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद झाली असून नवीन २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २५२ एवढी झाली आहे तर कोरोना बळींची एकूण संख्या ३३७७ एवढी झाली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्के एवढे आहे.

गेल्या चोवीस तासांत २६३५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २५ नमुने बाधित आढळून आले. कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून काल २ जणांना घरी पाठविण्यात आले. तसेच कोरोनाची लक्षणे जाणवल्याने ७ रुग्णांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ०.९४ टक्के एवढे आहे.