एकाच दिवसात ७०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे

0
181

देशात आत्तापर्यंत १८६०१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणार्‍या व्यक्तींच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल ७०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेल्याचे दिलासादायक चित्र आहे. हा देशातील आत्तापर्यंतच सर्वात मोठा आकडा आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३२५२ जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

१५ एप्रिल रोजी १८३ रुग्ण बरे झाले होते. तर दि. १६ एप्रिल रोजी २६०, १७ एप्रिल रोजी २४३ १८ एप्रिल रोजी २३९ तर १९ एप्रिल रोजी ३१६ जण कोरोनामुक्त झाले होते. मात्र दि. २० एप्रिल या एकाच दिवशी तब्बल ७०५ जणांनी कोरोनावर विजय मिळवत हे रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.

दरम्यान, आजपर्यंत महाराष्ट्रात एव्हाना ५७२, दिल्लीत ४३१, केरळमध्ये ४०८, बिहारमध्ये ४२, उत्तर प्रदेशात १४०, तामिळनाडूमध्ये ४५७, राजस्थान २०५, तेलंगणा १९०, मध्य प्रदेश १२७, गुजरात १३१ तर हरियाणामध्ये १२७ रुग्ण बरे झाले आहेत.