32 C
Panjim
Sunday, April 18, 2021

‘एओर्टिक व्हॉल्व’ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

  • डॉ. बिपीनचंद्र भामरे
    (कार्डियो-थोरॅसिक सर्जन)

आपल्या हृदयाच्या झडप शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यावर बद्धकोष्ठता, जखमेची सूज किंवा लालसरपणा, भूक कमी होणे आणि त्वरित वेदना यांसारखी समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला माहिती आहे का? हृदयातील व्हॉल्व खराब झाल्यावर त्या जागी नवीन व्हॉल्व बसविण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. याला ‘एओर्टिक व्हॉल्व प्रत्यारोपण सर्जरी’ असे म्हणतात. या शस्त्रक्रियेद्वारे हृदयातील खराब झालेली झडप काढून नवीन झडप बसवली जाते.
हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी मोठ्या रक्तवाहिन्या असतात. अशावेळी हृदयातून एकतर्फी रक्तप्रवाह सुरक्षित सुरू ठेवणं, ही व्हॉल्वची जबाबदारी आहे. तुम्हाला माहिती आहे काय? हृदयामध्ये मिट्रल, ट्रायकस्पीड, महाधमनी आणि पल्मोनिक व्हॉल्व्ज असतात. शिवाय, महाधमनी व्हॉल्व एखाद्याच्या डाव्या व्हेंट्रिकल (हार्ट पंपिंग चेंबर) आणि महाधमनी (शरीरातील सर्वात मोठी धमनी) दरम्यान स्थित आहे.

एओर्टिक व्हॉल्व अर्थात हृदयाच्या आजारांमधला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे हृमॅटीक हृदयविकार आहे. हा आजार होण्यामागे अनेक कारणे आहेत. वाढत्या वयानुसार हृदयाला सूज येणं, छातीत दुखणं, दम लागणं आणि हृदयाच्या झडपेला विषाणूंचा संसर्ग झाल्यास ही समस्या उद्भवू शकते.

महाधमनी व्हॉल्वसह उद्भवणार्‍या समस्या

हृदयाच्या धमनीचे प्रत्यारोपण करण्यामागे दोन कारणं असू शकतात. हदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करण्यार्‍या मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास शरीरातील अन्य अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. हृदयाच्या पंपिंगची क्षमता खूप कमी झालेली असते, अशा वेळी हृदयाची झडप बदलणं हा एकमेव पर्याय असतो. याशिवाय हृदयाची धमनी फुटल्याने अचानक छातीत रक्तस्त्राव होऊ लागतो. अशावेळी मृत्यू होण्याचा धोका सर्वांधिक असतो. अशा स्थितीत लगेचच तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागते. वेळीच उपचार झाल्यास रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.

एओर्टिक व्हॉल्व प्रत्यारोपण सर्जरी कोणावर केली जाते

अशक्तपणा, श्वासोच्छवासाची समस्या, छातीत दुखणे आणि चक्कर येणे अशी लक्षणं आढळून येणार्‍या रूग्णांना एओर्टिक व्हॉल्व प्रत्यारोपण सर्जरी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु, ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी हृदयातील व्हॉल्वची स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी रुग्णाची इकोकार्डियोग्राफी तपासणी केली जाते. जर रुग्णांच्या हृदयातील धमनीची अवस्था बिकट असल्यास डॉक्टर लगेचच हृदयाची व्हॉल्व बदलून घेण्याची शिफारस करतात. हृदयाची समस्या असणार्‍या रुग्णाला वाचवून त्याला नवीन आयुष्य देण्यासाठी हृदयाची झडप बदलणे हा एकच पर्याय आहे.

हृदयाची झडप बदलणे या शस्त्रक्रियेबद्दल अनेकांच्या मनात भिती असते. परंतु, शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टरांकडून ही प्रक्रिया जाणून सर्व शंका दूर केल्या पाहिजेत. या शस्त्रक्रियेपूर्वी रूग्णाची वैद्यकीय चाचणी केली जाते. या चाचणी अहवालावरून रूग्णाला कुठलीही अलर्जी नाही ना हे पाहून औषधोपचार सुरू केले जातात. याशिवाय शस्त्रक्रियेआधी धुम्रपान व मद्यपान सोडण्यास डॉक्टर सांगतात.

एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी कशी केली जाते…

‘एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट’ ही शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी साधारणतः चार तास लागतात. यात छातीच्या उजव्या बाजूला एक लहानसा छेद करून ही शस्त्रक्रिया केली जाते. हृदय आणि फुफ्फुसांचे काम करण्यासाठी बायपास मशीन वापरली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान हृदय थांबविले जाते. अशात हृदयाची खराब झालेली धमनी काढून त्याजागी नवीन धमनी बसवली जाते.

हृदयाला चार झडपा (वॉल्व) असतात : २ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक) आणि २ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्तप्रवाह एका दिशेला वाहतो. हृदयाच्या दोन प्रकारच्या झडपा असतात. शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारची झडप निवडायची हे डॉक्टरांशी चर्चा करून ठरवावे. आपल्या स्वतःच्या प्राधान्यांनुसार आपण योग्य व्हॉल्वची निवड करू शकता. सामान्यत: हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या इतर अवयवांची स्थिती समजून घेण्यासाठी आणखी काही चाचण्या केल्या जातात. सर्व चाचण्या झाल्या की एकदा आम्ही शस्त्रक्रियेच्या एक दिवस अगोदर रुग्णाला दाखल करतो.

हृदयाची झडप बदलणं ही शस्त्रक्रिया केल्यानंतर एक आठवडा रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला घरी सोडले जाते. साधारणतः सहा ते आठ आठवड्यानंतर हा रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. आपल्या हृदयाच्या झडप शस्त्रक्रियेनंतर बरे झाल्यावर बद्धकोष्ठता, जखमेची सूज किंवा लालसरपणा, भूक कमी होणे आणि त्वरित वेदना यांसारखी समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

कोरोना लसीकरण घ्यावे का?

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज) या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात...

थर्टीन

लेख- १३ बायोस्कोप प्रा. रमेश सप्रे ‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ...

अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

योगसाधना - ५००अंतरंग योग - ८५ डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ...

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर) या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून...