ब्रायन फर्नांडिस याला फोन करून तो धमकी देत होता. या फोन कॉल्समुळे तो जाळ्यात अडकल्याचे बाणावलीकर यांनी सांगितले. मडगाव येथे येऊन मला भेट, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तो ब्रायन याला देत होता. आपले नाव फ्रांसिस असल्याचे सांगत होता, असे बाणावलीकर यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर सांतइनेज येथे ब्रायन याच्यावर ऍसिड हल्ला झाल्याने १ ते १३ ऑगस्ट या दरम्यान ब्रायन याला जे धमकी देणारे कॉल्स येत होते त्या माणसाचाच या हल्ल्यात हात असावा असा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी सदर फोन मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो फोन लोकप्पा मडकप्पा (कारापूर–साखळी) याचा असल्याचे पोलिसांना आढळून आले.
मात्र, त्याला ताब्यात घेतले असता त्याने तो फोन आपला नसल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्या क्रमांकासाठी जो फॉर्म भरण्यात आला होता त्यावर लोकप्पा मडकप्पा याचे नाव असले तरी फोटो मात्र अझरुद्दीन शेख याचा असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. फोन व सीमकार्ड विक्रेत्यानेही तो त्याचाच क्रमांक असल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, ऍसिड हल्ला अझरुद्दीन शेख याने केलेला असला तरी तो हल्ला करण्यास त्याला सांगणारा मडगाव येथील प्रमुख आरोपी अद्याप फरारी असून त्याचा शोध घेण्याचे काम चालू असल्याचे बाणावलीकर यांनी सांगितले. त्याला अटक केल्यानंतरच हल्ल्यामागील कारण कळू शकेल, असे ते म्हणाले.