नामांकित बंगाली चित्रपट निर्माते ऋतुपर्ण घोष यांचे काल वयाच्या ४९ व्या वर्षी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांना आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले होते. १९९४ साली त्यांच्या ‘हिरेर अंगटी’ या बालचित्रपटानंतर व ‘उनिशे एप्रिल’ या बंगाली चित्रपटानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
त्यांचे ‘दहन’, ‘असुख’, ‘चोखेर बाली’, ‘रेनकोट’, ‘बारिवाली’, ‘अंतर्महल’, ‘नौकाडुबी’ वगैरे चित्रपट बरेच गाजले. बंगाली चित्रपटसृष्टीतील ते एक आघाडीचे निर्माते गणले जात होते. त्यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवरांनी दुःख व्यक्त आहे.