ऋतुगंध वसंताचा..

0
1118

प्रा. लता सत्यवान नाईक

प्रत्येक ऋतूला गंध असतो असे म्हणतात. निसर्गकवी कालिदासांनी आपल्या ऋतुसंहारया खंडकाव्यात असे लिहिलेय की ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत या सहा ऋतूंमध्ये धरणीमाता विविध रंग आणि विविध रूपे धारण करते. आणि म्हणूनच म्हटले जाते की प्रत्येक ऋतूचा गंध वेगळा, रंग वेगळा अन् रूपही वेगळेच. या सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ रंग, गंध आणि रूप असते वसंताचे!

ख्रिस्ती कालगणनेनुसार पृथ्वीमातेचे वय इ..पूर्व तेरा हजार वर्षे आहे. म्हणजे गेली तेरा हजार वर्षे हा वसंत ऋतू नित्यनेमाने आपली हजेरी पृथ्वीवर लावतो आहे. पण दरवर्षी त्याचे आगमन जणू नयी नव्हेली दुल्हनसारखे असते. त्याच्या येण्याने पाने, फुले, पशूपक्षी, मानवच नव्हे तर सगळी सजीवनिर्जिवांनी सजलेली धरणीमायच वसंत प्रसन्न, वैभवसंपन्न करून टाकतो. वैभव कशाचे तर फुलांचेफक्त फुलांचे अन् फुलांचेच! फुलांचा बहार असा भरभरून, ओसंडून वाहतो की या वसंतफुलांचा पुरेपूर फायदा घेणारा एखादा प्रेमवेडा त्याची मनधरणी करत म्हणतो

बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है

मेरा मेहबूब आया है….

या मेहबूबची वसंतातली जादू प्रत्यक्ष देवदेवतांनीही अनुभवली. कालिदासांनी अनेक प्रेमकाव्ये रचली. आपल्या प्रियेसाठी रानावनात बहरून येणारी गिरिमल्लिकेची फुले पाठवली. आजही अनेक कवी काव्ये रचून वसंत ऋतूला शब्दांत बांधून ठेवतात. प्रेमकविता आपल्या प्रेमिकेला अर्पण करतात. वसंत बापटांसारखे कविसम्राट लिहिते होतात

आली स्वप्नलता बहरास,

दोन्ही जीवांच्या मीलनघडीला

मोहरला मधुमास

हा मधुमास अनेक रंगांची उधळण करण्यासाठी अनेक फुलांची निर्मिती करतो. वेगवेगळ्या रंगांची, गंधांची, आकारांची फुले लेवून धरती सजते. झाडावेलींचे दुःखकष्टांचे दिवस आता संपलेले असतात. पानगळ आलीच आयुष्यात, पण आता तेही दिवस गेले आहेत. नवी पालवी फुटली आहे. सुखाचे क्षण हळूहळू डोकं वर काढू लागले. बघता बघता हिरव्यालालसर कोवळ्या पालवीचे लुसलुशीत तारुण्य डोळ्यांत भरते, डोळे शांत होतात. हिरवीकंच पालवी पाहून हा आनंद डोळ्यांत साठवतो न साठवतो तोच छोट्याछोट्या कळ्या झाडांवर, वेलींवर जन्मास येऊ लागतात.

धरित्री मग ग. दि. माडगुकरांच्या लेखणीतून व्यक्त होते

रुसु नको, कलिके बाई

हास ना, उमल गडे, कर घाई

ऋतु वसंत पहा जादुगार हा आला

नितांत रम्य नवा साज साजरा ल्याला

बहरू दे नवतीची नवलाई

नवतेची नवलाई सांगणारा वसंतोत्सव खरे तर माघ महिन्यापासून सुरू होतो. माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमीम्हणतात. वसंत ऋतूचा हा पहिला दिवस उजाडतो तोच मुळी सुगंधित संदेश घेऊन. या सुगंधाला ज्ञानदेवी, वीणापाणी सरस्वतीचे शुभआशीष लाभतात. उत्तर भारतात वसंत पंचमीलाच श्रीपंचमीम्हणतात. या दिवशी सरस्वतीपूजन मोठ्या धूमधडाक्याने साजरे होते. ब्रह्माची निर्मिती म्हणजे देवी सरस्वती! चातुर्य, बुद्धीची प्रतीकात्मक देवी म्हणजेच शुभ्रवस्त्रधारिणी सरस्वती! कला, शास्त्र, विज्ञान, संगीत, नृत्य अशा अनेक क्षेत्रांत तिला सन्मानाने पुजले जाते. शुभ्र वस्त्रे धारण केलेली देवी सरस्वती शुद्ध, नितळ जलाशयातील शुभ्र कमळावर आसनस्थ झालेली आहे. हिच्या डाव्या खालच्या हातात पवित्र ग्रंथ आहे. तिचा उजवा खालचा हात चिरमुद्रा दाखवतो. उजव्या वरील हातात आहे अक्षरमाला आणि डाव्या वरच्या हातात ती धरते आहे अमृतकलशम्.

शुभ्र हंसाचे वाहन असणार्‍या सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून या दिवशी मुलांना प्रथम अक्षरओळख करून देण्यात येते. ब्राह्मणांना भोजन दिले जाते. पूर्वजांच्या स्मरणार्थ काही लोक पित्रतर्पणकरतात. या दिवशी अनेक ठिकाणी देवी सरस्वतीला पिवळे वस्त्रही नेसवले जाते. पिवळा रंग वसंत पंचमीचा शुभारंभ मानला जातो. वसंत पंचमीला पिवळ्या रंगाची वस्त्रे लोक धारण करतात व पूजाअर्चा करतात. पिवळी फुलेच देवीला वाहिली जातात व पिवळ्या रंगाचा नेवैद्य सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटतात. वसंत पंचमीला शाळाशाळांमधून विविध कार्यक्रम होतात. क्रीडास्पर्धा, गायन, नृत्य असे बहारदार कार्यक्रम होतात आणि संध्याकाळी मुले तसेच मोठी माणसे पतंग उडविण्यास जातात. खरे तर हा दिवस म्हणजे निसर्गोत्सवाचा, वसंतोत्सवाचा आणि ज्ञानोत्सवाचादेखील.

वसंतोत्सवाचा खरा आस्वाद घेतला तो कालिदासांनी. संस्कृत कवी कालिदास यांनी मेघदूत’, ‘ऋतुसंहारअशी लघुकाव्ये रचली, तर रघुवंशम्’, ‘कुमारसंभवम्अशा महाकाव्यांना रचतानाही निसर्गाला ते विसरले नाहीत. निसर्ग त्यांना खूप भावला. म्हणूनच मेघासारख्या निर्जीव वस्तूलादेखील त्यांनी निसर्गराज्यातले एक पात्र मानले. त्याला मेघदूतबनवले. आपल्या प्रियेला या मेघदूतातर्फे संदेश पाठवणारा हा मनस्वी प्रियकर! मेघ जेव्हा नभात गर्जू लागले तेव्हाच इथे पृथ्वीतलावर गिरिमल्लिकेचा बहर सजू लागला. गिरिमल्लिका म्हणजे पांढरा कुडा.’ संस्कृतमध्ये याला गिरिमल्लिकाअसे म्हणतात. कुड्याची फुले दिसायला मोगरीसारखी, पण सुगंधाचा विचार केला तर मोगरीचा सुगंध कुड्याला नाही. पूर्वीच्या वनात राहणार्‍या तरुणी आपल्या कानांत कुडीप्रमाणे ही फुले खोचत म्हणून या फुलांना कुडाहे नाव पडले. तर अशा या दुर्लक्षित कुड्याच्या फुलांनी कालिदासाचे लक्ष वेधून घेतले. मोगरीसारखी दिसणारी शुभ्र फुले मेघदूताला अर्पण करणारा संवेदनशील कवी म्हणजे कालिदास! निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार अजरामर व नित्यनूतन करणारा कवी म्हणजेच कालिदास!

ऋतुसंहारया काव्यखंडात वसंत ऋतूचे वर्णन करताना कालिदासांनी एक संस्कृत श्‍लोक रचला. ‘मुखं वा एतद् ऋतुनां यद् वसन्त,’ अर्थात सगळ्या ऋतूंमध्ये वसंत ऋतू महत्त्वाचा. वसंत ऋतू व कालिदास यांची मैत्री फारच सुंदर होती. ऋतुसंहाराच्या सहाव्या सर्गात कवीने वसंत ऋतूचे अतिशय सुंदर असे वर्णन केले आहे. ते लिहितात की हा ऋतू येतो तोच मुळी सगळ्यांना प्रसन्न करण्यासाठी. मनाला ऊर्जा देण्याचं कार्य तोच तर करतो. त्याचे येणे हृदयाची स्पंदने वाढवणारे असते. कारण काहीतरी खास असे या ऋतूत घडणार असते. आणि म्हणूनच आजही शांता शेळकेंच्या कवितेतून एखादी प्रेयसी आपल्या सजणाच्या शोधात निघते व वसंतात फुलणार्‍या रानफुलांना विचारते

जाईन विचारीन रानफुला

भेटेल तिथे ग सजण मला?

भग्न शिवालय परिसर निर्जन

पळस तरूंचे दाट पुढे वन

तरुवेली करतील गर्द झुला

भेटेल तिथे ग सजण मला!

वसंत ऋतूत महत्त्व दिले जाते ते आंब्याच्या मोहोराला. कालिदासांनी लिहिलंय की याच ऋतूमध्ये आमराईत कोकिळगान ऐकू येते. खरे तर कोकिळा जेव्हा गाऊ लागते तोच मुळी वसंताच्या आगमनाचा संकेत असतो. आंब्याला येणार्‍या मंजिर्‍यांचा मंद मंद सुगंध वातावरणाला प्रसन्न करून टाकतो. खरोखरच मन मदधुंदहोऊन जाते. या मंजिर्‍यांना मदनाचे बाण असे समजले जाते. याचे फुलणे आणि वसंताचे येणे यांचे समीकरण करत कालिदास वसंताला योद्धाम्हणून संबोधतात. या योद्ध्याच्या हातात आंब्याच्या मंजिर्‍यांचे तीक्ष्ण बाण असतात व प्रेमाने वेडे झालेले प्रेमिक या योद्ध्याच्या बाणाचे लक्ष्य ठरतात. आंब्याच्या या विशेष बहरण्यामुळे कालिदासांनी यालाच वसंतदूत असे म्हटले आहे. वसंत ऋतूच्या जीवनात नवचैतन्य आणणारा, जीवन फुलवणारा, संदेश घेऊन येणारा वसंतदूत!’ सुंदर, स्वच्छ, चैतन्यमयी सांजवेळ, शीतल चांदण्यारात्री, कोकिळेचे गायन, सुगंधित वारा, भृंगराजांचे सतत होणारे गुंजन, फुलांभोवतीचा त्यांचा वसंतातला असा खास गुंजारव, असा सगळ्या दिशांनी प्रेमरसाचा उन्माद वाढवणारे वातावरण वसंतात आपोआपच तयार होते. सगळी झाडेवेली फुलांच्या ओझ्याने वाकलेली असतात, आणि ही वाकलेली फुलझाडे अधिकच नम्र दिसू लागतात. लोभसवाणी वाटू लागतात. फुलांच्या सुगंधाने वातावरणातला गोडवा वाढतो, फुलांचे ओझे या झाडांना झालेले असते, पण त्याचे यांना दुःख नसते. कारण हे ओझेत्यांना हलकेवाटते. फुलांमध्ये कुणालाही स्वतःकडे आकर्षित करण्याची असीम अशी शक्ती असते. कालिदासांच्या नजरेतून तर तळ्यातली चिखलाचा सुखद सहवास सोसत फुललेली कमळेदेखील सुटली नाहीत. कालिदास म्हणतात की, कमळांच्या फुलण्याने तळेदेखील सुवासिक झाले. एकूणच हे जे नैसर्गिक रसायन तयार करणारा वसंत ऋतू आहे तो अधिकच सुखमय व्हावा म्हणून प्रार्थना करताना कालिदासांनी लिहिलंय– ‘भवतु तर वसन्तः श्रेष्ठकालः सुखाय|’

वसंतोत्सवाचा आनंद घ्यावा तर तो शांतिनिकेतनमध्येच जाऊन. कालिदासांप्रमाणेच रवींद्रनाथ टागोर हेदेखील निसर्गकवी, एक संवेदनशील प्रेमकवी. त्यांचे पिता देबेंद्रनाथ यांनी खरे तर शांतिनिकेतनची भव्य, ऐतिहासिक अशी वास्तू उभारली. झाले असे की, एक दिवस महर्षी देबेंद्रनाथ हिमालयात ध्यानचिंतनासाठी जात असताना एका माळजागेवर त्यांनी भोमांना आपली पालखी थांबवायला लावली. त्या माळरानावर दोन सप्तपर्णीचे भलेमोठे वृक्ष दिमाखाने उभे होते. इतरत्र कुठलीही झाडे नव्हती. पण ती सप्तपर्णीची झाडे त्यांचे मन मोहवून गेली. तिथली ती नीरव शांतता, अस्ताला निघालेला सूर्यनारायण, क्षितिजावर पसरलेली त्याची सोनेरीपिवळीलालसरनारिंगी छटा, स्वर्गसुखाचा आनंदच जणू महर्षींना लाभला. कितीतरी वेळ ते ध्यानमग्न होऊन बसले. आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की इथे एक अशी वास्तू उभारायची की त्यामुळे शांत वातावरण नांदेल. ध्यानचिंतन करण्यासाठी ती योग्य जागा असेल. अथक प्रयत्नांती एक भव्यदिव्य अशी वास्तू उभी राहिली. तिचे नामकरण झाले शांतिनिकेतन’, जे खर्‍या अर्थाने शांतीचे माहेरघर आहे. जे दोन सप्तपर्णीचे वृक्ष महर्षींना आवडले होते ते तसेच अजूनही तिथे आहेत. या वृक्षांच्या सावलीत महर्षींनी एक संगमरवरी चबुतरा बनवून घेतला. तिथे बसून ते तासन्‌तास ध्यान करायचे. पुढे रवींद्रनाथांनी तोच परिपाठ चालू ठेवला. शांतिनिकेतनची अमोल भेट महर्षींनी रवींद्रनाथांना बहाल केलीच, पण त्याचबरोबर एक मोठं उद्यानही प्रेमाची भेट म्हणून रवींद्रनाथांना त्यांच्या पिताजींनी दिली. हे उद्यान अनन्यसाधारण असं बनलं. कारण तेथे टागोर कुटुंबीयांनी वृक्षप्रेम भरभरून रितं केलेलं आहे. त्यांनी अनेक देशी तसेच विदेशी झाडे, झुडपे, फुलवेली लावून त्यांचा एक विलक्षण अद्वितीय असा संग्रह केला आहे.

इथल्या देशीविदेशी फुलांचा बहर खर्‍या अर्थाने वसंतात अनुभवता येतो. इथला बहावा वसंतात बहरतो. ‘आरग्वधम्हणजे अनेक रोगांचा वध करणारा, रोगांचे निवारण करणारा. हे सुबक संस्कृत नाम धारण करणारा बहावा जेव्हा फुलून येतो तेव्हा या झाडावरची पिवळी फुले पाहून सोन्याचा वर्षाव होतो आहे असे वाटते. तर कधी हा वृक्षच पिवळा पीतांबर नेसलेल्या एखाद्या गंधर्वासारखा दिसतो.

बहाव्याची फुले सुवास नसलेली, पण आपल्या आकर्षक रंगामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेणारी. शांतिनिकेतनमध्ये फुलणार्‍या या बहाव्याच्या झाडाचे वासंतिक कौतुक रवींद्रसाहित्यात सापडते. प्रेमवेड्या या कवीने आपल्या अनेक कविता झाडांवर, फुलांवर लिहिल्या. अनेक फुलांच्या उपमा आपल्या प्रियेला दिल्या. वसंताचा रंग अजून मोहक करतो तो रानावनात फुलणारा पलाशअर्थात पळस.’ ‘पळसाला पाने तीनचअशी म्हण या झाडामुळे प्रचलित झाली आहे. जेव्हा पानगळ होते तेव्हा हे झाड फारच भकास वाटते. असे वाटते की एखादी वृद्ध आजारी व्यक्ती अंतिम घटिका मोजत असावी. जीवनात अनेक संकटे झेलत जणू पलाश उभा असतो तटस्थपणे. पण पीछे दुःख है तो आगे सुख हैअशा कालचक्राप्रमाणे दिवस पालटतात. पळसाला नवीन अंकुर फुटतात. पानांची पालवी सजवण्यात तो वेळ घालवत नाही. सरळ एखाद्या उतावळ्या, यौवनाचा कळस गाठलेल्या उन्मादक तरुणीप्रमाणे बहरण्याच्या तयारीस लागतो. सुखाचा साज लेवून पळस फुलून येतो. वसंतू ऋतूत पळस फुलतो, आणि तो असा फुलतो की झाडावर एकही पान नजरेस पडत नाही. संपूर्ण झाड पोपटाच्या चोची ल्यायल्याप्रमाणे लाल रंगात न्हावून निघते. लालकेशरी फुलांमुळे जणू वृक्षच अग्नीच्या ज्वालांनी भरून गेल्यासारखा वाटतो. वार्‍याने हलणारा, फुलांच्या ओझ्याने विनम्र झालेला पळस फुलला की धरित्री लालभडक शालू नेसल्यासारखी वाटते. धरणीचा हा पळसफुलांचा श्रृंगार कालिदासांच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी आपल्याच शब्दांत धरणीचे वर्णन केले

रक्तांशुका नववधुरिव भाति भुमिः॥

ऋश्रराश ेष ींहश षेीशीींअसं इंग्रजी नाव भूषवणारा पळस गुरुदेवांनी शांतिनिकेतनमध्ये खूप प्रेमाने सांभाळला. पळसाबरोबरच रवींद्रनाथांनी पंगार्‍याच्या झाडालाही सौख्याने वाढायला दिले. पळस व पंगारा ही नावे जरी पुल्लिंगी असली तरी या झाडांचे पुष्पवैभव स्त्रियांनाही लाजवणारे. ‘मी फुलू की तू फुलतोसअशी चढाओढ लावत हे दोन वृक्ष दाटीवाटीने शांतिनिकेतनच्या जीवनात रंग भरताना उभे दिसतात.

गौतम बुद्धांना त्यांच्या मातेनेमायाराणीनेजे नाव ठेवले अशोकत्यामागेही असाच वसंतबहार कारणीभूत ठरला. लुंबिनी येथे विश्राम करण्यासाठी उतरलेली गर्भवती मायाराणी तिथल्या उद्यानातल्या अशोक वृक्षाखाली बसली आणि लालकेशरी, पिवळ्या फुलांचे मोहक गुच्छ तिच्या नजरेस पडले. ती अशी मोहून गेली, आनंदून गेली की हे फूल तिच्या अगदी हृदयात स्थान मिळवून बसले. मायाराणी सुखरूपपणे अशोकाच्या झाडाखालीच प्रसूत झाली. तिने एका तेजस्वी, लालकेशरी चेहर्‍याच्या सुदृढ बालकाला जन्म दिला आणि त्याचे नाव अशोकठेवले. वसंताच्या बहरात अशोकफुलला. अशोकवनात रावणाने सीतेचे हरण करून तिला लपवून ठेवले. जेव्हा जेव्हा रावण तिच्या भेटीस येत असे तेव्हा तेव्हा सीता त्याला चुकवण्यासाठी या अशोकवनात लपायची. अशोकाच्या झाडाखाली रामाची ही विरहिणी अश्रू ढाळत बसायची. अशोकवृक्षाच्या आशीर्वादाने सीतेचा शोकदूर झाला व रामाने तिची रावणाच्या तावडीतून सुटका केली. शोक दूर करणारा म्हणून या वृक्षाला अशोकअसे नाव दिले.

रवींद्रनाथांचे तर वसंतात अशोकाची फुले पाहून आपल्या प्रियेवरचे प्रेम उचंबळून येत असे. मनाच्या गाभार्‍यात प्रेमाने या फुलांच्या आठवणी साठवत त्यांनी काव्य रचले

ढहश रीहेज्ञर लश्रेेाी हर्रींश ूशरीपशव षेी ाू ीेपसी

रपव ख हर्रींश षळश्रश्रशव ींहशा ुळींह ाू र्श्रेींश

फुलांवर विलक्षण प्रेम करणारे रवींद्रनाथ वेडे व्हायचे ते फुलांच्या बदलणार्‍या रंगछटा पाहून. आणि म्हणायचे, दिवसेंदिवस दुःख दूर करत सुखाकडे नेणारा हा शोक’! कारण हे गुच्छ म्हणजे त्यांना परिराज्यातले जळणारे दिवे वाटायचे. फुले जेव्हा फुलतात तेव्हा पिवळ्या रंगाची असतात व हळूहळू रंग बदलत, नारंगी रंग धारण करत, लालभडक रंगाचा आकर्षक साज लेवून मगच कोमेजतात.

जेव्हा कोकिळेच्या मधुरगानाने वसंताचे वातावरण धुंद होते, फुले नुसती भरभरून फुललेली असतात, अशावेळी दूरदेशीहून तिच्यासाठी’ ‘त्याचासंदेश येतोअगदी अत्तराच्या कुपीतून!

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे

दोघंही प्रत्यक्ष भेटली तर ती एकमेकांना भेट म्हणून वसंतबहाराची फुलेच देत असत, पण जेव्हा निष्ठुर जगाला त्यांचे प्रेम मान्य नसते, तेव्हा ते एकमेकांपासून दुरावतात, पण फुलणारी फुले पाहून दोघंही दुःखी होतात. वसंत येथेही बहरतो, वसंत येथेही शहारतो. पण मधूइथे न् चंद्रतिथे अशी परिस्थिती झालेले प्रेमीजन फुलांतूनदेखील अतीव दुःखच शोधतात. एकमेकांचा हा दुरावा दोघांनाही सहन होत नाही. एकूणच काय तर प्रेमीजनांसाठी वसंत हा प्रेमोत्सवच असतो. ‘ऋतुसंहारया प्रेमकाव्यात कालिदासांनी त्याकाळीही वसंताच्या या विरहाच्या छटेचे वर्णन केले, तर रवींद्रनाथांनीदेखील पुरबीया प्रेमकवितांच्या संग्रहात मोगर्‍याची फुले व आपली प्रेयसी विजॉयायांच्यावर एक प्रेमकविताच लिहून टाकली.

थहशप वरीज्ञपशीी वशीलशपवी ेप ींहश पळसहीं रीं श्ररीीं

ऊरीश्रळपस ीळीं रीं र्ूेीी ुळपवेु

रपव षीेा ींहशीश ुरींलह ाश से रुरू

ख ींहळपज्ञ ुश ुेपीं ाशशीं रसरळप,

डे ींहीेु ाश ींहश क्षरीाळपश सरीश्ररपव र्ूेी

र्ुेींश ळप ींहश ोीपळपस….

प्रेयसीपासून दूर राहणं रवींद्रनाथांना आवडलंच नव्हतं. पण तिची आठवण म्हणून मोगरीची तिनेच केलेली माळ त्यांना प्रेयसीच्या स्पर्शाची आठवण करून देणार होती. ही किमया वसंतच करू शकतो. चाफा, चमेली, सावर, जाई, मोगरी, जास्वंद, पळस, पंगारा, बहावा अशी अनेक फुले रवींद्रनाथांनी आपल्या साहित्यात बंदिस्त केलीत. हे करण्यामागे एक हेतू होता. इतरांनीही वृक्ष लावावेत, वृक्षांचे संवर्धन करावे. कारण जो वृक्षांचे रक्षण करतो त्याचे वृक्ष रक्षण करतो. आपले पहिले वृक्षसाहित्य बनबानीरवींद्रनाथांनी आपले मित्र डॉ. सर जगदिशचंद्र बोस यांना अर्पण केले. कारण झाडांची भाषा समजण्याइतके संवेदनशील डॉ. बोस ही त्यांना सापडलेली पहिली व्यक्ती होती.

एरवीच सुंदर असलेला निसर्ग वसंत पंचमीपासून जास्तच सुशोभित दिसू लागतो. निसर्ग म्हणजे एक जिताजागता गुरू. या गुरूकडून अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. मानवाने स्वतःची अस्वस्थ प्रकृती स्वस्थठेवण्यासाठी या गुरूच्या चरणी सतत राहिले पाहिजे. निसर्गाकडे अहंकार नसतो. ‘अहंशून्यताहा निसर्गाचा सर्वात मोठा गुण! आम्हीही अहंशून्य होण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.

वसंत म्हणजेच आशावादाचे जिवंत प्रतीक. पानगळ येते, पानगळ जाते. संकटे येतात, संकटे विरून जातात. झाडांना पालवी फुटते. फुलांनी पुढे ती सजतात, शृंगारतात. यावरून काय शिकावे? पानगळ म्हणजे निराशा. कडू अनुभव. कडू आठवणी. त्या विसरून नव्या जोमाने, नवचैतन्य अंगीकारून, नव्या जीवनाचे स्वागत करायचे. आशावादी विचार, सक्रिय कार्यपद्धत, स्नेहमयी स्वभाव, प्रेमळ वागणूक या सगळ्यांचा दस्ताऐवज वाढवून आपल्याबरोबर इतरांचेही जीवन सुकर करावे. जीवनात वसंत फुलवावा. मानवाचे आणि वसंताचे अजून एक नाते आहे. वसंताला भारतीय संस्कृतीने संतपद बहाल केले आहे. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो तो संतअसे मानले जाते.

वसंत ऋतूला धर्मजाती अशा भेकड कल्पना, रीतीरिवाज मान्य नाहीत. तो हरेक धर्माला, जातीला आपल्यात सामील करून घेतो. विदेशात ख्रिस्तीबांधव डिीळपस’, यइश्रेीीेाअसे उत्सव साजरे करतात. वसंताला सलाम करतात. तर मुस्लीम बांधवांनी वसंताला धार्मिक महत्त्व दिलेले आहे. प्रेमाचा संदेश पसरवणारी वसंत पंचमी सुफी दर्ग्यांवर साजरी केली जाते. तेराव्याचौदाव्या शतकात अमीर खुसरोसारखे शायर होऊन गेले. त्यांच्या गुरूचे नाव हजरत निजामुद्दिन. हजरतांचा आवडता शागीर्द होता नूह. नूह हा गुणी शागीर्द होता म्हणून आपली गादी पुढे चालवण्यासाठी हजरत निजामुद्दिन यांनी त्याची नेमणूक केली. पण काळाला हे मान्य नव्हते. अगदी तरुण वयात नूह अकाली मृत्यू पावला. हजरत निजामुद्दिन यांना हा आघात सहन झाला नाही. ते खूपच दुःखीकष्टी झाले. आणि अमिर खुसरो यांना गुरूचे हे दुःख पाहवेनासे झाले.

एक दिवस खुसरो कालिकेच्या मंदिरासमोरून जात होते तेव्हा त्यांनी पाहिले की अनेक लोक पिवळी वस्त्रे धारण करून ढोलताशे वाजवत आहेत. मोहरीच्या फुलांचे पिवळेशार तुरे एकमेकांवर प्रेमाने फेकून गात आहेत, नाचत आहेत. खुसरोंनी थांबून विचारले की हा कुठला उत्सव तुम्ही साजरा करताहात? तिथे आनंदोत्सव मनवणार्‍या लोकांनी खुसरोंना सांगितले की आम्ही वसंत पंचमी साजरी करतोय. आज ज्ञानाची देवता सरस्वतीला फुले वाहून पूजा करतात. देवीला प्रसन्न करण्यासाठी आम्ही ही सरसोंची फुले देवीला वाहतो. खुसरोेंनी ठरवले की आपल्या गुरूलाही असेच प्रसन्न करायचे. खुसरोंनी लागलीच काही कव्वाल, काही फकीर, हजरत निजामुद्दिन यांचे काही शिष्य जमवले व सगळे हजरत राहत असत त्या सुफी दर्ग्याकडे गेले. सगळ्यांनी पिवळी वस्त्रे धारण करून सरसोंची फुले उडवून वसंतोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. हजरतदेखील हळूहळू या आनंदात सामील झाले व आपले दुःख काही काळापुरते तरी विसरले. आजही दिल्लीच्या हजरत निजामुद्दिन दर्ग्यावर वसंत पंचमी साजरी होते.

फुलांचा हा उत्सव फुलांसारखा, फुलांनीच साजरा करायचा. वसंत येतो तसा प्रसन्न वातावरण निर्माण करून गाजावाजा करतच निघायच्या तयारीस लागतो. पण त्याचे हे जाणे तसे कुणालाच भावत नाही. वसंताची मनधरणी करत राहणारे अनेक प्रेमीजन मग वसंतालाच आपल्या प्रियाच्या ठिकाणी मानतात व म्हणतात

आलेयेउनिया गेले

किती वसंतऋतू आणिक बहर

आता तरी आभाळांचे, निळे बाहू तू पसर

पण आभाळाचे निळे बाहू पसरण्याआधीच वसंत पसारहोतो. कारण आता ग्रीष्म ऋतूने आपल्या आगमनाचा संदेश ग्रीष्मलहरींतून पाठवलेला असतो. जेव्हा कोकिळेच्या मधुरगानाने वसंताचे वातावरण धुंद होते, फुले नुसती भरभरून फुललेली असतात, अशावेळी दूरदेशीहून तिच्यासाठी’ ‘त्याचासंदेश येतोअगदी अत्तराच्या कुपीतून!

पण आभाळाचे निळे बाहू पसरण्याआधीच वसंत पसारहोतो. कारण आता ग्रीष्म ऋतूने आपल्या आगमनाचा संदेश ग्रीष्मलहरींतून पाठवलेला असतो.