Home बातम्या उ. प्र. आमदारासह सर्वांना जामीन

उ. प्र. आमदारासह सर्वांना जामीन

0

डान्स बार प्रकरण

पणजीतील एका हॉटेलात बारबालांना आणून तेथे मुजर्‍याचे आयोजन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला उत्तर प्रदेशचा आमदार महेंद्रकुमार सिंह यांच्यासह अजयप्रताप सिंह, धर्मेंद्र प्रसाद, संजीव गुनोर शाह, कोमल बहादुर थापा व बाबू राजेंद्र प्रसाद घंटा यांची काल येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रु.च्या बॉण्डवर सशर्त जामिनावर मुक्तता केली.

पणजी पोलीस स्थानकावर तीन दिवस हजेरी लावण्याची तसेच तपासकामात सहकार्य करण्याची अट त्यांना घालण्यात आली आहे.