उसगावात मोटरसायकल अपघातात वाळपईतील युवक ठार

0
100

गावकरवाडा-उसगाव येथे रस्त्यावर असलेल्या खडीमुळे जीए- ०४ के- ६३३८ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून घसरून पडल्याने सोमनाथ देवू गावस (३०) या युवकाचे निधन झाले. तिस्क-उसगाव येथे इस्पितळात नेला तेव्हा त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केला. हा अपघात काल सकाळी झाला. कोपर्डे-वाळपई येथील हा युवक असून सहा महिन्यापूर्वीच त्याला वेर्णा येथे खाजगी फॅक्टरीत नोकरी लागली होती. काल सकाळी तो मोटरसायकलने कामावर जात असताना हा अपघात झाला. फोंडा पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी अपघाताचा पंचनामा केला.