उसगावमधील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

0
42

धाटवाडा-उसगाव येथील एमआरएफ कंपनीसमोर राष्ट्रीय महामार्गावर काल बुधवारी पहाटे कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात उत्तम चक्रबहाद्दूर धामी (३०) हा युवक जागीच ठार झाला.

तिस्क-उसगाव येथील उत्तम धामी हा जीए-०५ क्यू-०४२० या दुचाकीने सिद्धेश्वरनगर फोंडामार्गे-औद्योगिक वसाहत वेर्णा या ठिकाणी कामाला जात होता. उसगाव येथील एमआरएफ कंपनीजवळ दुचाकी पोहचताच अचानक कुत्रा आडवा आला. त्यामुळे दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटून तो जागीच कोसळला. युवकाने डोक्यावर हेल्मेट परिधान न केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली आणि जागीच ठार झाला.
अपघातात ठार झालेल्या उत्तम धामी हा विवाहित असून, त्याला आठ महिन्यांचा मुलगा आहे. तिस्क आऊट पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून देण्यात आला आहे.