Home बातम्या उसकई येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

उसकई येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

0

उसकई येथील युनियन बँक समोरील रस्त्यावर आज सकाळी मारुती आल्टो कार व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन दुचाकीस्वार महेश वळवईकर (२८) रा. पोंबुर्पा हा जागीच ठार झाला.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०३ एल ८१३१ ही मोटारसायकल पोंबुर्पाहून म्हापसाकडे तर जीए ०३ एच ३८४७ ही आल्टो मारुती कार फेअर आल्त म्हापसा येथून हळदोणाकडे जात असता सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उसकई येथील युनियन बँक जवळील रस्त्याकडे पोहोचताच दोन्ही वाहनांत समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने दुचाकीवरील स्वार महेश वळवईकर हा दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला व जागीच ठार झाला. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जखमी झालेल्या महेश वळवईकर याला इस्पितळात नेले असता तो मृत पावल्याचे जाहीर केले. अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पुढील तपास चालू आहे.