उष्माघाताने बळींची संख्या 13 वर

0
15

नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात 11 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या सोहळ्यात उष्माघातामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. सध्या 50 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.