अन्न व औषध प्रशासनाची कृती
आग्वाद तुरुंगातील कैद्यांना झालेल्या विषबाधेच्या व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने राज्याच्या सर्व भागातील उपाहार गृहे, गाडे व अन्य अन्न पदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील काही उपाहार गृहांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेतली जात नसल्याने रोगराई पसरते. पाण्याच्या बाबतीत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदूषित पाण्यामुळे काविळीसारखा रोग पसरण्याची शक्यता असते. आग्वाद तुरुंगातील घटनेमुळे अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळेच वरील मोहीम सुरू करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करून जनतेमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जागृती करण्याचे काम केले होते, परंतु त्याचा विशेष उपयोग झाला नाही. त्यामुळेच खात्याने प्रत्यक्ष छापासत्र सुरू करून आस्थापनांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.